Team Agrowon
या वनस्पतींवर संशाेधन संचालनालयात संशाेधन करून याचे व्यावसायिक वाण विकसित करता येतील का, यावरही संशाेधन केले जाणार आहे.
ही प्रक्रिया दीर्घकालीन अाहे. भविष्यात चांगले वाण उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना व्यावसायिक शेतीतून निर्यातक्षम शाेभिवंत फुले उपलब्ध हाेतील, असा विश्वास डॉ. प्रसाद यांनी व्यक्त केला.
कास पठारवर पर्यटकांना अनिर्बंध वागण्यामुळे दुर्मिळ फुले धाेक्यात आली आहेत. पर्यटकांनी केवळ फुले पाहण्याचा आनंद घ्यावा.
फुले, वनस्पती ताेडणी, त्यावर चालणे, लाेळणे असे प्रकार करू नये, असे आवाहन डॉ. प्रसाद यांनी केले आहे.
अन्यथा भविष्यात कास पठारवर फुले शिल्लक राहणार नाहीत, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. गुलछडी, शेवंतीचे वाण प्रसारित करणार पुष्प संशाेधन संचालनालयाच्या वतीने देशभरातील गुलछडीच्या २२, तर शेवंतीच्या विविध रंगांच्या १५० पेक्षा जास्त वाणांवर संशाेधन सुरू आहे.
या विविध वाणांचे प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आली असून, पुढील महिन्यात यांना फुले येतील. या वेळी राज्याच्या विविध भागांतील शेतकऱ्यांना हे प्रक्षेत्र पाहणीसाठी खुले करण्यात येणार असून, शेतकऱ्यांशी चर्चा करून विविध वाण प्रसारित करण्यात येणार आहे.