Team Agrowon
सध्या लाल टोमॅटो बाजारात चांगलाच भाव खात असताना. आता काळ्या टोमॅटो देखील बाजारात दाखल झाला आहे. तुम्हाला याचे फायदे आणि मिळणार नफा पाहून आश्चर्य वाटेल.
या काळ्या टोमॅटोची शेती लाल टोमॅटो प्रमाणेच केलि जाते. याचे फायदे मात्र प्रचंड असून या टोमॅटोला विदेशात मोठी मागणी आहे. कॅन्सरसाठी काळे टोमॅटो वापरले जातात
इंग्रजीत याला इंडिगो रोज टोमॅटो म्हणतात. जेव्हा तुम्ही तो कापता तेव्हा त्याचा रंग लाल टोमॅटोसारखाच म्हणजे लाल असतो.
भारतातही आता या टोमॅटोची लागवड सुरू झाली आहे. याची वाढ होताना ते हिरवे नंतर लाल होते. लाल झाल्यावर ते निळे होऊन मग काळे होते.
या टोमॅटोची बियाणे ऑनलाइन खरेदी करता येते. या बियाण्याच्या एका पॅकेटची किंमत 450 रुपये आहे.एका पॅकेटमध्ये सुमारे 130 बिया असतात.
काळ्या टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. काळे टोमॅटो खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.
या काळ्या टोमॅटोमध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. साखरेच्या रुग्णांसाठी हा रामबाण उपाय ठरू शकतो. तसेच कर्करोगाशी लढण्यास या टोमॅटोचा उपयोग होतो.