विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा
आधी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन लागवड केली जात असे. मात्र अवकाळी पाऊस, गारपीट, संततधार पाऊस अशी हवामान स्थितीमुळे उत्पादकता घटलेली.
गेल्या तीन वर्षांत एकरी २ क्विंटल इथपर्यंत उत्पादकता घसरली. याच पार्श्वभूमीवर मागील वर्षी खरिपात पहिल्यांदा दीड एकरात बीबीएफद्वारे सोयाबीन पेरणी केली.
या तंत्रामुळे पावसाचे अतिरिक्त पाणी सरीतून निघून गेले. शिवाय चराच्या माध्यमातून मातीत ओलावा कायम राहून पिकाला गरजेवेळी पाण्याची उपलब्धता झाली.
योग्य व्यवस्थापनातून एकरी ७ ते ८ क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळाले.
पारंपरिक पद्धतीने लागवडीसाठी २६ ते ३० किलोपर्यंत बियाणे लागायचे. मात्र बीबीएफ पद्धतीने लागवडीसाठी फक्त १८ ते २० किलो बियाणे पुरेसे झाले.
त्यामुळे वाढीव उत्पादकतेसह बियाणे बचतीचा उद्देश साधता आल्याचे, बंड सांगतात.