टीम ॲग्रोवन
कोल्हापूरमध्ये दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त म्हशींची सौंदर्य स्पर्धा पंचगंगा नदीकिनारी भरवली जाते.
पशुपालक पाडव्यानिमित्त म्हशीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
पशुपालक त्यांच्या म्हशीला वेगवेगळ्या प्रकारची सजावट करतात.
गळ्यामध्ये, पायांना, शिंगांना गोंडे लावतात. तसेच त्यांना विविध रंगांनी रंगवले जाते. आणि म्हशींची मिरवणूक काढली जाते.
या स्पर्धेविषयी कोल्हापूर जुना बुधवार पेठ येथील पशुपालक संदीप पाटील सांगतात, "आमच्याकडे आगास, मैना, हिरा, टिक्का, सरदार नावाच्या चार म्हैशी आहेत. आम्ही वर्षभर त्यांचे पालन करतो.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रम दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरात पूर्ण उत्साहामध्ये पार पडला.