Team Agrowon
जगात अनेक प्रकारची फळे असतात ज्याबद्दल आपल्या क्वचितच माहिती असते. ब्रेडफ्रूट हे एक अस फळ आहे ज्याबद्दल कमी लोकांना माहित आहे.
आकाराने छोट असणारं ब्रेडफ्रूट फळ दिसायला अगदी फणसासारखंच दिसतं.
फणसासारख्या दिसणाऱ्या ब्रेडफ्रूट फळ चवीला ब्रेडसारखेच लागते. हे मोरेसी परिवारातील एक ट्रॉपिकल फळ असून साउथ पॅसिफिकमध्ये आढळते.
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून ते सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत हे फळ बाजारात येते. स्टार्चयुक्त या फळामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात.
ब्रेडफ्रूटमध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, पोटॅशिअम या सारखी पोषक तत्त्व असतात.
ब्रेडफ्रूट बेक करून खाल्ल्यावर याची चव बटाट्यासारखी लागते. या फळाचा गर जवळजवळ कस्टर्ड सारखा असतो.
फळातील स्टार्च घटकामुळे याच्या चवीची तुलना ब्रेडच्या चवीशी होते. त्यामुळेच या फळाला भात, भाकरीला पर्याय म्हणूनही खाल्ले जाते.