Soybean Market : ब्राझीलची सोयाबीन निर्यात कमी

Anil Jadhao 

ब्राझीलने २०२२ मध्ये ४३२ लाख टन मक्याची निर्यात केली. २०२१ मधील ब्राझीलची मका निर्यात २०६ लाख टनांवर होती. म्हणजेच मागीलवर्षी मका निर्यात दुप्पटीपेक्षा अधिक झाली.

ब्राझीलच्या मक्याचा मुख्य ग्राहक इराण होता. इराणला १२ टक्के मका निर्यात केला.

ब्राझीलने २०२३ मध्ये चीनला जास्त निर्यातीचे उद्दीष्ट ठेवले आहे. ब्राझील यंदाही मका निर्यातीची गती कायम ठेवणार आहे. जानेवारीत ४३ लाख टन मका निर्यातीचे उद्दीष्ट आहे.

मागील हंगामात ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन घटले होते. तरीही ७७० लाख टन निर्यात झाली.

डिसेंबर महिन्यात १७ लाख टन निर्यात केली. २०२१ मध्ये याच महिन्यातील निर्यात २३ लाख टन होती. ब्राझीलच्या सोयाबीनचा चीन सर्वात मोठा ग्राहक होता. तब्बल ७० टक्के निर्यात चीनला केली होती.

जानेवारीत १३ लाख टन निर्यात होण्याची शक्यता असून मागीलवर्षी याच महिन्यात २३ लाख टन सोयाबीन निर्यात झाली होती. ब्राझीलमध्ये जानेवारीच्या शेवटी सोयाबीन काढणीला सुरुवात होईल आणि फेब्रुवारीपासून निर्यातीची गती वाढण्याचा अंदाज आहे.