Team Agrowon
गावाकडे बोगनवेल नजरेला पडतेच पडते. या फुलांची नावे अनेकांना सांगता येत नाही. परंतु सजावटीसाठी म्हणून या वेलाची तुम्ही शाळेत किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी लागवड केलेली पाहिली असेल.
या वेलाच्या फुलांना काटे असतात. तसेच फुलांचा रंग गुलाबी असते. या वेलाची १८ प्रकार आहेत. ब्राझील आणि पश्चिम पेरू आदि देशांमध्ये या फुलांचं मूळ सापडतं.
यांच्या काट्याची लांबी १ ते १२ मीटरच्या दरम्यान असते. काट्याचा रंग काळसर असतो.
जगातील विविध देशात या फुलांची वेल आढळतात. तसेच या वेलाच्या वाणासाठी इंटरनेशनल बोगनवेल रजिस्ट्रेशन अथॉरिटी दिल्लीमध्ये स्थापन करण्यात आली आहे.
शोभेसाठी तसेच कुंपण म्हणून बुगनविलियाची लागवड करतात. कमी पावसाच्या भागात ती वाढविली जाते. तसेच ती थंड हवामानातही जोमाने वाढते.
या वेलीला वेगवेगळे आकार देऊन ती घराभोवती व भिंतीवर वाढविली जाते. जमिनीतील क्षारांचा योग्य प्रकारे उपयोग करून ती वाढते. विविध प्रकारचे आधार देऊन ती वाढविली जाते.