Mahesh Gaikwad
प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध असणारी वस्तू म्हणजे ओवा. ओवा एक मसाल्याचा प्रकार असून आरोग्यासाठी पोषक मानला जातो.
ओव्यामध्ये तंतुमय पदार्थ (फायबर), अँटी-ऑक्सिडंट्स आणि या सारखे अजूनही पोषक घटक असतात.
आरोग्याच्या विविध समस्यांवर ओव्याचा उपयोग औषधी म्हणून केला जातो. याशिवाय ओवा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
जर तुम्ही योग्य प्रकारे ओव्याचे सेवन केले, तर तुम्हाला याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होवू शकतो.
यासाठी एक कप पाण्यामध्ये ओवा घाला आणि १० मिनिटांपर्यंत हे पाणी चांगले उकळून घ्या. हे वजन कमी करण्यासाठीचे उत्तम पेय आहे.
याशिवाय एक चमचा मध आणि ओव्याचे मिश्रण करून खा. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.Ajwain Benefits
एक चमचाा ओवा एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी यामध्ये एक लिंबाचा रस घालून हे पाणी प्यायल्यास वेटलॉसमध्ये फायदा होतो.
याशिवाय तुम्ही दररोज ओव्याचा चहा पिऊ शकता. यामुळे तुमची चयापचायच सुधारते आणि वजन कमी करण्यास फायदा होतो.