Anuradha Vipat
अभिनेता सलमान खानचा फिटनेस आजही अनेकांना वेड लावतो पण तुम्हाला माहिती आहे की सलमानला काही आजारांनी ग्रस्त केले आहे
सलमानने स्वत:याचा खुलासा केला आहे की तो ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, ब्रेन एन्युरिझम आणि एव्ही मॅलफॉर्मेशन सारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त आहे.
सलमानला या आजाराच्या वेदना इतक्या असह्य होतात पण तरीही तो आपलं अभिनय करणं सोडत नाही
ट्रायजेमिनल न्यूराल्जियाला "सुसाइड डिजिज" असेही म्हणतात कारण त्यामुळे चेहऱ्यावर तीक्ष्ण विद्युत शॉकसारखी वेदना होते
ब्रेन एन्युरिझम म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिनीत फुगवटा असतो, जो फुटल्यास तो प्राणघातक ठरू शकतो.
एव्ही विकृती म्हणजे मेंदूतील रक्तवाहिन्यांची एक असामान्य नेटवर्क असते, ज्यामुळे झटके आणि मेंदूतील रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो.
या आजारासाठी २०११ मध्ये सलमान शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेला गेला होता.