Anuradha Vipat
बॉडीकॉन ड्रेस घालताना शरीराची ठेवण आणि वक्रता हायलाइट होत असल्याने योग्य स्टायलिंग करणे अत्यंत गरजेचे असते.
बॉडीकॉन ड्रेस फिटिंगचा असतो, त्यामुळे योग्य टिप्स फॉलो केल्यास तुम्हाला अगदी सहज परफेक्ट लुक मिळू शकतो.
बॉडीकॉन ड्रेस खाली चांगल्या प्रतीचे टमी टकर किंवा बॉडी शेपर नक्की घाला.
या ड्रेसमध्ये कपड्यांच्या कडा किंवा लाईन्स बाहेर दिसू नयेत म्हणून नेहमी सीमलेस पँटी आणि ब्रा निवडा.
जर तुम्हाला फिगरचा अवघडलेपणा जाणवत असेल, तर काळा, नेव्ही ब्लू, मरून किंवा बॉटल ग्रीन यांसारखे डार्क रंग निवडा.
बॉडीकॉन ड्रेसवर हाय हील्स, वेजेस किंवा स्टिलेटोज अतिशय सुंदर दिसतात.
ड्रेस स्वतःच हायलाईट होत असल्याने गळ्यात मोठे दागिने घालणे टाळा; त्याऐवजी केवळ मोठे इअररिंग्स किंवा स्लीक बेल्ट वापरा.