Anuradha Vipat
काळी जादू सारख्या नकारात्मक शक्तींपासून रक्षण करण्यासाठी ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्रात काही प्रभावी उपाय सांगितले आहेत.
दररोज सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण वाचल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
आठवड्यातून किमान एकदा पाण्यात समुद्री मीठ टाकून त्या पाण्याने घराला पुसावे.
दररोज संध्याकाळी घरात भीमसेनी कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा.
घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याची पाने किंवा अशोक वृक्षाच्या पानांचे तोरण लावावे.
दररोज १०८ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे अत्यंत प्रभावशाली मानले जाते
घरात गुग्गुळ, लोबान आणि कडुनिंबाच्या पानांचा धूप केल्याने घरातील कोपऱ्यांमधील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते.