Mahesh Gaikwad
कारले चवीला कडू असले, तरी आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे असतात. विशेषत: मधुमेहाच्या रूग्णांसाठी कारले अत्यंत गुणकारी मानले जाते.
पण केवळ कारलेच नाही, तर त्याच्या बियासुध्दा आरोग्याासाठी फायदेशीर असतात.
कारल्याच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि इतर गुणधर्म असतात, जे सर्दी, खोकला आणि संसर्गजन्य आजारांच्या संक्रमणांपासून संरक्षण करते.
कारल्याच्या बियांचे तेल किंवा पेस्ट त्वचेला लावल्यास त्वचा स्वच्छ, तजेलदार होते. तसेच यामुळे त्वचेवरील पुरळाची समस्या कमी होते.
कारल्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, जे बध्दकोष्ठतेची समस्या दूर करतात. ज्यामुळे पोट साफ होते.
शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही कारल्याच्या बिया उपयुक्त आहेत.
व्हिटामिन-सी आणि पोटॅशिअमने भरपूर कारल्याच्या बिया रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी फायदेशीर आहेत.
कारल्याच्या बियांमधील काही घटक मेटाबोलिझम वाढवतात आणि चरबी कमी करतात. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.