Anuradha Vipat
रात्रीच्या जेवणात भाकरी खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर मानले जाते.
भाकरी ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची असल्यास ती गव्हाच्या पोळीपेक्षा अधिक पौष्टिक आणि आरोग्यदायी असते.
भाकरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे ती सहज पचते .
भाकरी खाल्ल्यानंतर शांत आणि चांगली झोप लागण्यास मदत होते.
ज्वारी आणि बाजरीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते.
भाकरीमधील फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वजन कमी करण्यास किंवा नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाल्ल्यास शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळते.