Anuradha Vipat
२ ते ३ चमचे बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डाग पडलेल्या भागावर लावून १५ ते २० मिनिटे तशीच राहू द्या.
समप्रमाणात पांढरा व्हिनेगर आणि कोमट पाणी मिसळा. हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून डागांवर फवारा आणि १० मिनिटे थांबा. मऊ स्पंजने डाग पुसून घ्या.
डाग पडलेल्या जागेवर अर्ध्या लिंबाचा रस पिळा आणि त्यावर थोडे मीठ भुरभुरा. लिंबाच्या सालीनेच त्या जागेवर २ ते ३ मिनिटे गोलाकार दिशेने घासा. १० मिनिटांनी साध्या पाण्याने फरशी धुवून कोरडी करा.
कोमट पाण्यात १ चमचा लिक्विड डिशवॉश मिसळून फेस तयार करा. हा फेस रांगोळीच्या डागांवर लावून थोडा वेळ भिजत ठेवा. स्क्रबरने हलकेच घासून स्वच्छ पाण्याने पुसा.
जर रंगामध्ये केमिकल जास्त असेल आणि डाग अजिबात निघत नसतील, तर कापसाच्या बोळ्यावर थोडे नेल पेंट रिमूव्हर किंवा रबिंग अल्कोहोल घ्या.
फरशीवर पाणी टाकण्यापूर्वी कोरड्या ब्रशने किंवा झाडूने सुकी रांगोळी पूर्णपणे बाजूला करा, अन्यथा पाणी लागून रंग अधिक पसरू शकतो.
फरशीवर कधीही तीव्र ॲसिड किंवा ब्लीच थेट वापरू नका, त्यामुळे टाईल्सचा रंग खराब होऊ शकतो.