Anuradha Vipat
केस निरोगी, दाट आणि लांबसडक करण्यासाठी शरीराला अंतर्गत पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते.
फळांमध्ये असणारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स केसांची गळती रोखून त्यांची वाढ वेगाने करतात.
आवळा केसांच्या मुळांना मजबूत करते, कोंडा दूर करते आणि केस अकाली पांढरे होण्यापासून रोखते.
पेरूमध्ये व्हिटॅमिन-सी चे प्रमाण संत्र्यापेक्षाही जास्त असते. हे केसांचे तुटणे कमी करते.
किवीमध्ये व्हिटॅमिन-ई, सी आणि झिंक मुबलक प्रमाणात असते. हे डोक्याच्या त्वचेमधील रक्ताभिसरण सुधारते.
पपईमध्ये 'फॉलिक ॲसिड' आणि व्हिटॅमिन-ए असते. हे टाळूवर नैसर्गिक तेल तयार करण्यास मदत करते.
स्ट्रॉबेरीमध्ये उच्च प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-सी असते. हे केसांच्या मुळांचे बाहेरील प्रदूषणापासून रक्षण करते आणि केसांना चमकदार बनवते.