Anuradha Vipat
नवरात्रीचा उपवास जितक्या नियमांनी केला जातो, तितक्याच काळजीने तो सोडणे देखील गरजेचे आहे.
नऊ दिवस उपाशी राहिल्यानंतर अचानक जड, तेलकट किंवा तिखट अन्न खाल्ल्यास अपचन, गॅस, पोटदुखी किंवा उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो.
दिवसभर उपाशी राहिल्यामुळे पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे थेट अन्न खाण्याऐवजी द्रव पदार्थांनी सुरुवात करा.
द्रव पदार्थांनंतर लगेच जड जेवण करू नका. त्याऐवजी १५-२० मिनिटांनी फळे खा. सफरचंद, पपई, टरबूज किंवा डाळिंब यांसारखी रसाळ आणि फायबरयुक्त फळे खा.
उपवास सोडतानाचे मुख्य जेवण साधे आणि पचायला हलके असावे. कमी तेलात बनवलेला वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी किंवा कढी उत्तम पर्याय आहे.
भजी, समोसे, साबुदाणा वडा किंवा पुरी खाऊन उपवास सोडू नका. यामुळे लिव्हर आणि पोटावर अचानक ताण येतो.
उपवास सोडताना लगेच चहा-कॉफी पिणे टाळा, यामुळे गॅसचा त्रास वाढतो.