Anuradha Vipat
लहान मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि दृष्टी तेज करण्यासाठी व्हिटॅमिन 'ए' , ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त आहार देणे सर्वात महत्त्वाचे आहे.
वाढत्या वयात स्क्रीन टाईम वाढल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर येणारा ताण योग्य आहारामुळे कमी करता येतो.
गाजर आणि रताळ्यामध्ये 'बीटा-कॅरोटीन' भरपूर प्रमाणात असते. यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा दूर होतो, दृष्टी तीक्ष्ण होते.
पालक, मेथी आणि कोबी यांसारख्या पालेभाज्या डोळ्यांसाठी अत्यंत गुणकारी आहेत.
बदाम आणि अक्रोड मुलांच्या मेंदूच्या विकासासोबतच डोळ्यांसाठीही फायदेशीर आहेत.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच अंडी हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत.
संत्री, मोसंबी, आवळा, लिंबू आणि स्ट्रॉबेरी यांसारखी आंबट फळे आहारात ठेवा. व्हिटॅमिन 'सी' डोळ्यांमधील रक्तवाहिन्यांचे आरोग्य उत्तम ठेवते.