Anuradha Vipat
वयाच्या ३० नंतर पुरुषांच्या शरीरात चयापचय क्रिया मंदावते आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी दरवर्षी कमी होऊ लागते.
या वयात जबाबदाऱ्या आणि मानसिक ताण वाढल्यामुळे वजन वाढणे, पोट सुटणे आणि थकवा येणे अशा समस्या सुरू होतात.
आठवड्यातून किमान ३ ते ४ दिवस वजन उचलण्याचा व्यायाम ,पुश-अप्स, किंवा स्क्वॅट्स करा.
आहारात अंडी, चिकन, पनीर, डाळी, मोड आलेली कडधान्ये आणि सुक्या मेव्याचा समावेश करा.
रोज रात्री ठराविक वेळी झोपायला जा आणि ७ ते ८ तासांची पूर्ण झोप घ्या. झोपेच्या वेळीच शरीरात हार्मोन्सचे संतुलन होते
दरवर्षी लिपिड प्रोफाईल (कोलेस्टेरॉल), रक्तदाब , ब्लड शुगर आणि व्हिटॅमिन D३ व B१२ ची तपासणी नक्की करा.
रोज किमान १० ते १५ मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करा. आपल्या आवडीच्या छंदासाठी वेळ काढा.