Mint Benefits : कमी कॅलरीज आणि हाय फायबर असे आहेत पुदीन्याचे फायदे

sandeep Shirguppe

पुदीना गुणकारी

पुदीना या औषधी वनस्पतीला आयुर्वेदात महत्वाचे स्थान आहे. याचबरोबर आपल्या रोजच्या जेवणात चव आणण्यासाठी पुदानाचा वापर केला जातो.

Mint Benefits | agrowon

वजन कमी करण्यासाठी उपयोग

पुदीनाला इंग्रजीमध्ये Mint म्हणतात. पचन सुधारण्यासाठी, वजन घटवण्यासाठी, मळमळ, डिप्रेशन, थकवा आणि डोकेदुखीवर आराम मिळवण्यासाठी सर्वाधिक पुदीन्याचा वापर होतो.

Mint Benefits | agrowon

पुदीना अत्यंत थंड

पुदीना हा मुळातच थंड असतो यामुळे घरात चटकदार पदार्थ बनवत असताना स्वाद येण्यासाठी आपण पुदीन्याचा हमखास वापर करतो.

Mint Benefits | agrowon

अनेक घटक

पुदीन्यामध्ये मेन्थॉल, प्रथिने, चरबी, कर्बोदके, व्हिटॅमिन-ए, राइबोफ्लेविन, तांबं आणि लोह आढळतात.

Mint Benefits | agrowon

कमी कॅलरीज

कमी कॅलरीज आणि हाय फायबर असल्याने डायजेशन सुधारून कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. आणि यामुळे वजन कमी होण्यास फायदा होतो.

Mint Benefits | agrowon

थकवा कमी करण्यास मदत

पाण्याच्या बाटलीमध्ये पुदीन्याची सात ते आठ पानं टाकून रात्रभर हे पाणी फ्रीजमध्ये ठेवायचे यानंतर दिवसभर काम करताना पाणी पिल्यास आपल्याला थकवा जाणवणार नाही.

Mint Benefits | agrowon

पुदीना चहाही उपयुक्त

याशिवाय पुदीन्याची चटणी, रायता, पुदिना चहा देखील तुम्ही घेऊ शकता. पुदीना खाल्ल्यामुळे मेटाबॉलिजम वाढतं. त्यामुळे अनावश्यक चरबी कमी होते.

Mint Benefits | agrowon

अनेक आजारांवर उपाय

हृदयासंबंधी आजार डायबिटीस, कॅन्सर, हायपरटेन्शन सारख्या आजारामुळे वजन वाढायला सुरुवात होते. त्यामुळे पुदिना जर नियमित खाल्ला तर असे आजारांवर उपाय ठरू शकतो.

Mint Benefits | agrowon

पोटविकारांवर गुणकारी

कोलेस्ट्रॉल, गॅस, एसिडिटी, पोट फुगणं अशा समस्या असतील तर त्यासाठी पुदिना अत्यंत गुणकारी आहे.

Mint Benefits | agrowon

डॉक्टरांचा सल्ला घ्या

टीप : तुमच्या आहारामध्ये कोणत्याही पदार्थांचा समावेश करण्यापूर्वी किंवा बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Mint Benefits | agrowon
indian navy | Agrowon