Team Agrowon
गूळ व गुळापासून तयार केलेले विविध मूल्यवर्धित पदार्थांचा वापर ॲनिमियाग्रस्त आणि गर्भवती महिलांच्या पोषण आहारामध्ये केला जातो.
शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजन किंवा शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अशा पदार्थांचा वापर केला जातो.
शेंगदाणे आणि तूप सोबत गुळाचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हिमोग्लोबिन वाढीस मदत करते. शरीरातील ऊर्जा पातळी वाढवून, अशक्तपणा कमी करण्यास फायदेशीर.
अँटिऑक्सिडेंट आणि अँटीकार्सिनोजेनिक गुणधर्म असल्याकारणाने आतड्यांचे आरोग्य चांगले राखते.
सांधेदुखीवर गुणकारी. विशेषतः शरीरातील स्नायूंची झीज भरून काढण्याचे महत्त्वाचे कार्य गूळ करतो.