sandeep Shirguppe
सुक्या माव्यामध्ये खारीकला खूप महत्व आहे. अनेक आजारांवर मात करण्यासाठी खारीकचा उपयोग केला जातो.
लहान बाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना उपयुक्त म्हणून खारकेकडे पाहिले जाते. खारीक कॅन्सरचा धोकाही कमी करू शकतो. असे एका संशोधनातून समोर आले आहे.
खारकेत फायबर, कार्बोहायड्रेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, तांबे, जस्त, फॉस्फरस, लोह हे मुख्य घटक आढळतात.
तुम्ही रोज दोन खारीक खाल्लात तर पोटाशी संबंधित बरेच आजार दूर होण्यास मदत होते. खारिकांमध्ये पॉलिफेनॉल संयुग आढळते, जे पचनापासून मधुमेहापर्यंत संरक्षण करते.
खारीकपासूनही भरपूर ऊर्जा मिळू शकते. आपण फक्त दोन खारीक खाऊन ११० कॅलरी ऊर्जा मिळवू शकता.
खारीक दाह कमी करणारी असून त्यामुळे शरीरातील जळजळ होण्याची समस्या कमी होते.
खारीक यकृतातील जळजळ आणि सांधेदुखीमुळे होणारी जळजळ कमी करते. खारकेच्या सेवनाने जळजळीशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
खारिकांमध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात. हे बॅक्टेरियाच्या संसर्गापासून संरक्षण करते. व्हायरल, फ्लू, सर्दी आणि फ्लू यांसारख्या समस्या टाळण्यासाठी खजूर प्रभावी आहेत.
टीप - तुम्हाला खारीक खायची असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रत्येकाची शरिररचना वेगळी असते