Holy Basil Benefits : रोज ४ तुळस पाने खा अन् पळवा आळस, तुळस खाण्याचे फायदेच फायदे

sandeep Shirguppe

तुळस दूर करेल आळस

आजीबाईच्या बटव्यात तुळशीच्या पानांना सर्वाधिक महत्व देण्यात आले आहे. यामुळे तुळस ही मानवी शरिराला खूप चांगली मानली जाते.

Holy Basil Benefits | agrowon

तुळशीला महत्व

आपल्या संस्कृतीमध्ये तुळशीच्या झाडाला महत्व असल्याने प्रत्येकाच्या दारी तुळस ही आपल्याला पहायला मिळते.

Holy Basil Benefits | agrowon

तुळशीच्या पानांना महत्व

तुळशीच्या पानांचे नियमित सेवन केल्यास तुम्हाला ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते, याबाबत आयुर्वेदात सांगितलं आहे.

Holy Basil Benefits | agrowon

पचन क्रिया सुधारण्यास मदत

तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास पचन सुधारते असे मानले जाते. ज्यामुळे वजन संतुलित राहते आणि लठ्ठपणा दूर राहतो. किंवा तुळशीच्या पानांचा काढा करून पिल्यास शारिरीक व्याधिही दूर होतात.

Holy Basil Benefits | agrowon

तोंडातील दुर्गंधी कमी होते

तुळशीमध्ये असलेले गुणधर्म देखील तोंडातील दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात.

Holy Basil Benefits | agrowon

स्कीनसाठी गुणकारी

स्कीनला हेल्दी आणि पिंपल्सपासून दूर ठेवण्यासाठी तुळस हा चांगला पर्याय आहे.

Holy Basil Benefits | agrowon

पोटदुखीवर उपाय

पोटात जळजळ, पोटदुखी, गॅस, ब्लोटींग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो.

Holy Basil Benefits | agrowon

तुळशीमध्ये लोह

तुळशीमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, मॅंगनीज, अँटिऑक्सिडंट्स, अॅंटी-इंफ्लामेटरीआणि अॅंटी-माइक्रोबियल गुणधर्म असतात.

Holy Basil Benefits | agrowon

चहा किंवा जेवणात तुळस वापरा

तुळशीची पाने सकाळी रिकाम्या पोटी खावीत. किंवा चहा आणि अन्नामध्ये मिसळून देखील सेवन केल्यास आपल्याला फायदे मिळू शकतात.

Holy Basil Benefits | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

ही माहिती संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'agrowon ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

Holy Basil Benefits | agrowon
fashion show | agrowon