Custard Apple : स्वस्तात मस्त सीताफळाचे फायदे वाचून तुम्हीही खाल

sandeep Shirguppe

सीताफळ खाण्याचे फायदे

सध्या सीताफळाचा सिझन सुरू आहे. हे फळ बऱ्यापैकी डोंगरी भागात हमखास मिळते. याचबरोबर तुमच्या परसबागेतही सीताफळाचे झाड लावू शकता.

Custard Apple | agrowon

रोज एक सीताफळ खा

सीताफळाचे दरही कमी असल्याने सर्वांना उपयुक्त म्हणून याचा उपयोग होतो. याचबरोबर त्याचे फायदे तुम्ही वाचले तर आवर्जून खाल.

Custard Apple | agrowon

सीताफळ पोषक

सीताफळ हा पोषक घटकांचा खजिना म्हणून ओळखतात, व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सीडंट्स समृद्ध असल्याने हे अॅलर्जीचे संरक्षण करते.

Custard Apple | agrowon

हृदयाला उपयुक्त

सीताफळ हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. भरपूर मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असल्याने हृदयविकाराच्या धोका कमी होतो.

Custard Apple | agrowon

रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत

सीताफळमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६ मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत होते.

Custard Apple | agrowon

मधुमेह, बीपीवर नियंत्रण

सीताफळमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम प्रमाण अधिक असते, यामुळे मधुमेह, उच्च आणि निम्न बीपी नियंत्रणास मदत होते.

Custard Apple | agrowon

हिरड्यांचा त्रास कमी

दात किंवा हिरड्यांना त्रास होत असेल तर सीताफळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. रोज एक सीताफळ खाल्ल्याने दात आणि हिरड्यांना त्रास कमी होतो.

Custard Apple | agrowon

कोलेस्टेरॉल नियंत्रीत

कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी सीताफळचे सेवन उपयुक्त ठरेल. सीताफळचे सेवन केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहू शकते.

Custard Apple | agrowon

गर्भधारणेस मदत

गरोदरपणात दररोज सीताफळ घेतल्यास गर्भपात होण्याचा धोका कमी होतो. सीताफळ न जन्मलेल्या मुलाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते, हे बाळाच्या मेंदूच्या विकासास देखील उपयुक्त ठरू शकते.

Custard Apple | agrowon
shri krushna temple | agrowon