Anuradha Vipat
हँडलूम म्हणजेच हातमागावर तयार केलेले कपडे खरेदी करणे यामागे अनेक फायदे आहेत .
हातमागावरील कपडे हे संपूर्णपणे नैसर्गिक धाग्यांपासून बनवले जातात
या कपड्यांमध्ये हवा खेळती राहते. त्यामुळे उन्हाळ्यात हे कपडे शरीर थंड ठेवतात आणि घाम शोषून घेतात.
प्रत्येक हँडलूम कपडा हा विणकराने स्वतःच्या हाताने विणलेला असतो. यामुळे दोन कपडे कधीही तंतोतंत सारखे असू शकत नाहीत.
प्रत्येक साडी किंवा कुर्तीमध्ये एक वेगळी कलाकुसर आणि वेगळेपण पाहायला मिळते.
हँडलूम कपड्यांची निर्मिती पर्यावरणाला हानी न पोहोचवता होते.
जेव्हा तुम्ही एक हँडलूम कपडा खरेदी करता, तेव्हा त्याचा थेट आर्थिक फायदा देशातील ग्रामीण विणकरांना होतो.