Swapnil Shinde
सांगली जिल्ह्याच्या मिरज पूर्व भागातील बेडगची ओळख दुष्काळ गाव म्हणून होती. पण आता त्या गावाने आपली नवीन ओळख निर्माण केली आहे.
म्हैसाळ सिंचन योजनेचं पाणी माळावर पोहोचल्यानंतर द्राक्ष, ऊस, भाजीपाला पिकू लागला. त्यामुळे ग्रामस्थांचं आयुष्य बदलून गेलं.
शिवार हिरवंगार झाल्याने प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारासमोर बुलेट गाड्या उभ्या राहू लागल्या
बुलेटप्रेमी असलेल्या या गावात गाडीची इतकी क्रेझ आहे. की आजमितीस गावात तीनशेंवर बुलेटची धडधड आहे.
बुलेटची क्रेझ फक्त पुरुषांमध्येच आहे. असे नाहीतर तरुणी आणि विवाहित महिलाहीबुलेट घेऊनच गावातून बाहेर पडतात.
आजघडीला गावातल्या शेतकऱ्याच्या दारात शेतकामासाठी लागणारे ट्रॅक्टर किंवा इतर अवजारे नसेल, पण बुलेट मात्र आहे. बुलेटही त्या गावच्या प्रत्येकाची स्टेटस् सिबॉल झाली आहे.
पूर्वी गावामध्ये पाटील, सरपंच आणि इतर हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांकडे बुलेट होती पण, ईर्षेपोटी गावकऱ्यांमध्ये जणून बुलेट खरेदीची स्पर्धाच वाढली.
दिवाळी असो दसरा, नाहीतर वाढदिवस प्रत्येक सण-उत्सवाला लाॅटनेच बुलेटची खरेदी होते. असले हौशी गाव बघायला बुलेटच्या कंपनीचे लोक गावात आले.