Anuradha Vipat
महागाईच्या काळात पार्लरवर हजारो रुपये खर्च करण्याऐवजी तुम्ही हे साधे आणि प्रभावी 'ब्युटी हॅक्स' वापरून पैसे वाचवू शकता.
साखर आणि मध एकत्र करून ओठांवर चोळा. यामुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाते
महागड्या क्लिंजिंग ऑईलऐवजी नारळाचे तेल वापरून वॉटरप्रूफ मेकअप सहज काढा.
केस धुण्यापूर्वी किंवा धुतल्यानंतर थोडे तेल हातावर चोळून केसांना लावा यामुळे केसांचा गुंता कमी होतो.
तुमची लिपस्टिक तुटली असेल तर ती चमच्यात काढून थोड्या पेट्रोलियम जेली सोबत गरम करा आणि डबीत भरा.
तांदूळ धुतानाचे पाणी फेकून न देता ते केसांवर स्प्रे म्हणून वापरा.
चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवा असेल तर कॉफी पावडरमध्ये थोडे दही मिसळून १० मिनिटे लावा.