Anuradha Vipat
हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे स्नायू आखडतात आणि सांध्यांमधील रक्तप्रवाह मंदावतो, ज्यामुळे वेदना आणि जडपणा वाढतो.
थंड हवेचा थेट संपर्क टाळण्यासाठी गरम कपडे, मोजे आणि गुडघ्यांसाठी 'नी-कॅप'वापरा. यामुळे सांध्यांमधील रक्ताभिसरण सुरळीत राहते.
वेदना होत असल्या तरी पूर्णपणे हालचाल थांबवू नका. घरातच स्ट्रेचिंग, योगासने किंवा कोवळे ऊन आल्यावर चालण्याचा व्यायाम केल्याने सांध्यांची लवचिकता टिकून राहते.
तीळ तेल, मोहरीचे तेल किंवा महानारायण तेलाने सांध्यांना हलक्या हाताने मालिश करा. यानंतर गरम पाण्याच्या पिशवीने शेक दिल्यास स्नायूंचा आखडलेपणा त्वरित कमी होतो.
हिवाळ्यात 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता भासल्याने हाडे कमकुवत होतात. रोज सकाळी १५ ते २० मिनिटे कोवळ्या उन्हात बसल्याने हाडांना बळकटी मिळते.diet
आहारात हळद, आले, लसूण, अक्रोड, जवस आणि तीळ यांचा समावेश करा. यातील घटक सांध्यांची सूज कमी करण्यास मदत करतात.
थंडीत तहान कमी लागत असली तरी शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. पुरेसे पाणी प्यायल्याने सांध्यांमधील वंगण टिकून राहते.