Mahesh Gaikwad
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. परिणामी शारिरीक आणि मानसिक ताण-तणावाच्या समस्या सुरू होतात.
जर तुम्हाला व्यायामासाठीही वेळ मिळत नसले, तर तुम्ही दिवसभरातील केवळ १० मिनीटे जरी स्वत:ला दिली, तरी तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता.
कामाच्या व्यस्ततेमुळे किंवा अन्य कारणांनी तुम्हाला व्यायामासाठी वेळ मिळत नसेल, तर दररोज १० मिनीटे मेडीटेशन करा. ज्यामुळे तुम्हाला निरोगी आरोग्य आणि तणावापासून मुक्ती मिळेल.
दररोज १० मिनीटे मेडीटेशन केल्याने शरीराला खूप फायदे होतात. मेडीटेशनमुळे मानसिक तणाव कमी होतो.
स्पर्धेच्या युगात बऱ्याच जणांची वर्क लाईफ संतुलित ठेवताना दमछाक होते. त्यामुळे बरेचजण भविष्याची चिंता करत असतात. अशात मेडीटेशनमुळे तणाव कमी करण्यास मदत होते.
बऱ्याच जणांना अनिद्रा, अपुऱ्या झोपेची समस्या असते. दरोरज मेडीटेशन केल्यामुळे चांगली झोप लागते आणि आरोग्यही सुधारते.
जास्त ताणतणावाचा परिणाम पचनक्रियेवर होतो. अशात मेडीटेशनमुळे शरीर आणि रिलॅक्स राहते आणि पचनक्रियाही सुधारते.
मेडीटेशनमुळे मन स्थिर होते. यामुळे एकाग्रता वाढते. परिणामी कामाची उत्पाकता वाढते.