Mahesh Gaikwad
देशात विकासाचे रोल मॉडेल म्हणून बारामतीचा नावलौकीक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बारामतीचा झपाट्याने विकास होत आहे.
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दुरदृष्टी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा विकासकामांचा झपाटा यामुळे बारामतीचा विकास वेगाने होतो आहे.
परदेशातील धरतीवर बारामतीकरांना सुविधा मिळाव्यात याकडे बारामतीचे लोकप्रतिनिधी म्हणून अजित पवार यांचा नेहमीच आग्रह राहिलेला असतो.
एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने नुकताच बारामतीमध्ये 'हॅप्पी स्ट्रीट' हा परदेशातील धरतीवर आधारित उपक्रम राबविण्यात आला.
'हॅप्पी स्ट्रीट्स या उपक्रमाला बारामतीकारांनी अक्षरशः उदंड प्रतिसाद दिला. लहान मुलांसोबतच मोठ्यांनी देखील हॅपी स्ट्रीट उपक्रमांमध्ये सहभागी होत रविवारची सकाळ अविस्मरणीय केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या उपक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रत्येक खेळाच्या ठिकाणी जाऊन लहानांसह मोठ्यांना प्रोत्साहन दिले.
बारामती शहर सर्वांग सुंदर करताना नागरिकांना खऱ्या अर्थाने त्याचा आनंद घेता आला पाहिजे हा उद्देश या उपक्रमाच्या माध्यमातून सफल झाल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.
हॅप्पी स्ट्रीट्समध्ये सापशिडी, गोट्या, ल्युडो अशा विविध खेळांचा खेळाचा आनंद बच्चे कंपनीने लुटला. तर कोणी धनुष्यबाण, स्केंटींग, सायकलिंगचाही आनंद घेतला.
वारली पेंटिंग, स्केचिंग, टॅटू काढणे, फेस पेंटिंग, पोट्रेट काढणे याचाही नागरिकांनी आनंद लुटला. या उपक्रमाचा शेवट झुंबा नृत्याने झाला. यामध्ये सर्वच वयोगटातील स्त्री पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुशोभित केलेल्या विद्या ते गदिमा रस्त्याच्या माध्यमातून बारामतीकरांना विविध खेळांतून आनंद मिळावा, या उद्देशाने हॅपी स्ट्रीटस या उपक्रमाचे आयोजन केल्याचे फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी म्हटले.