Banana Crop : केळी ठरतेय फायदेशीर

Anil Jadhao 

कोल्हापूर येथील शेतकरी सचिन जाधव यांनी अर्धा एकर शेतामध्ये केळीची लागवड केली.

आंतरपीक म्हणून त्यांनी झेंडू लावले होते. झेंडूच्या फुलातून त्यांना निव्वळ नफा हा साठ हजार रुपये मिळाला.

पहिल्या वर्षी केळीचे निव्वळ उत्पन्न २१ टन मिळाले. त्यांनी ५००० रुपये प्रति टनाने केळी विकली. त्यांनाना एक लाख पाच हजार रुपये निव्वळ नफा मळाल्याचे सांगितले.

केळीच्या खोडवा पिकामध्ये जाधव यांना ११ टन केळीचे उत्पन्न अपेक्षित आहे. आतापर्यंत साडेसात केली उत्पन्न मिळाले.

येणाऱ्या एक महिन्यांमध्ये तीन टन उत्पन्न अपेक्षित आहे. यावर्षी केळीा दर बारा हजार रुपये प्रति टन आहे. त्यामुळे त्यांना यंदा एक लाख २५ हजार रुपये नफा अपेक्षित आहे.

केळी पीक ऊस पिकाला चांगला पर्याय आहे. उसानंतर पीक फेरपालट म्हणून केळी पिकाकडे पाहता येते, असे जाधव यांनी सांगितले.

cta image
क्लिक करा