Fertilizer Management : डाळिंब बागेत बायोमिनरल खतांचा संतुलित वापर

Team Agrowon

सद्यस्थितीमध्ये फॉस्फेट आणि पोटॅश यांचे विघटन करणाऱ्या सूक्ष्म जीवाणूचा रॉक फॉस्फेट सोबत केलेला वापर हा शिफारसीत खतांच्या वापराने मिळणाऱ्या उत्पादनाच्या तुलनेमध्ये अधिक दिसून येतो.

Fertilizer Management in Pomogranate | Agrowon

डाळिंब पिकाची प्रामुख्याने लागवड असणाऱ्या मुरमाड आणि उथळ जमिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण खनिज रचनेमुळे मुख्य पोषण तत्त्वाची फॉस्फरस आणि पोटॅशियम यांची कमतरता आढळून येते.

Fertilizer Management in Pomogranate | Agrowon

सामान्यतः जमिनीतील अन्नद्रव्यांची उणीव भरून काढण्यासाठी आणि पीक उत्पादनास पोषक जमिनी तयार करण्यासाठी काही रासायनिक स्वरूपातील फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त खते (Fertilizer) वापरली जातात.

Fertilizer Management in Pomogranate | Agrowon

ज्या वेळी जमिनीत विद्राव्य फॉस्फेटयुक्त खत वापरले जाते तेव्हा ते सहजपणे न विरघळणाऱ्या कॅल्शिअम, अॅल्युमिनियम आणि लोह यांच्या अवशेषांमध्ये रूपांतरित होते. त्याचप्रमाणे पोटॅशयुक्त खतांच्या बाबतीतही असेच आहे.

Fertilizer Management in Pomogranate | Agrowon

चिकणमातीयुक्त (२:१) जमिनीमध्ये या खतांचा वापर केल्यास ती न विरघळणाऱ्या स्वरूपात जमिनीमध्ये स्थिर होतात.

Fertilizer Management in Pomogranate | Agrowon

डाळिंब बागेतील फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त खतांचा अति प्रमाणातील वापरामुळे त्यातील मूलद्रव्ये (फॉस्फरस आणि पोटॅशियम) यांचे जमिनीमध्ये स्थिरीकरण मोठ्या होते.

Fertilizer Management in Pomogranate | Agrowon
Watermelon | Agrowon