Sanjana Hebbalkar
सरकारने बैल शर्यतीची बंदी उठवल्यानंतर यावेळीची शर्यत अगदी उत्साहाने साजरी होणार आहे.
अनेक गावात बैल पोळ्याच्या निमित्ताने शर्यतीचं आयोजन केलं जातं. वेगवेगळ्या जातीच्या बैलाची शर्यत लावली जाते
शर्यतीत जिंकणाऱ्या मोठ्या रकमेचं मानधन तर दिलं जात मात्र बैल मालकाला मिळणार मान वेगळाचा असतो
या शर्यतीत प्रामुख्याने आर्कषण असणारा बैल म्हणजे खिलार. या बैलाला शेतासाठी आणि शर्यतीसाठी जास्त मागणी आहे.
खिलार बैलाला महाराष्ट्रात मानाचं स्थान दिलं जातं. ही जात महाराष्ट्राची शान असून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सीमावर्ती जिल्हात आढळते.
खिलार जातीची बैल शेती कामामध्ये प्रचंड मेहनती असतात. त्याच्या शरीरयष्टीमुळे अगदी जड भार देखील ते सहजपणे वाहून नेतात
त्याशिवाय खिलार बैलाची पळण्याची क्षमता देखील प्रचंड असते. त्यामुळे या बैलांना शर्यतीत उतरवल्यानंतर जिकण्याची शक्यता जास्त असते. यामुळेच याला जास्त मागणी आहे.