Anuradha Vipat
सांधेदुखी ही आजकाल सर्व वयोगटातील लोकांमध्ये आढळणारी सामान्य समस्या बनली आहे.
आयुर्वेदानुसार वातदोष असंतुलित झाल्यास सांधेदुखी वाढू शकते.
कोमट तिळाच्या तेलाने सांध्यांना हलक्या हाताने मालिश केल्यास आराम मिळू शकतो.
हळदीमध्ये दाहशामक गुणधर्म असतात. हळदीचे दूध किंवा आहारात हळदीचा समावेश फायदेशीर ठरू शकतो.
हलका व्यायाम, योगासने आणि स्ट्रेचिंगमुळे सांध्यांची हालचाल सुधारण्यास मदत होते.
अतिरिक्त वजनामुळे सांध्यांवर ताण वाढतो. त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे.
आयुर्वेदात मेथी आणि सुंठ यांचा वापर सांध्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो.