Anuradha Vipat
सर्दी आणि खोकल्यासाठी तुम्ही तुळशी, आले, दालचिनी, लवंग, मिरी आणि खडीसाखर वापरून घरगुती काढा बनवू शकता.
चला तर मग आज आपण पाहूयात सर्दी आणि खोकल्यासाठी घरगुती काढा कसा बनवायचा.
या काढ्यामुळे श्वसनमार्गातील कफ सैल होण्यास आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होते.
हा काढा दिवसातून दोनदा प्यायल्याने आराम मिळतो.
घरगुती काढा बनवण्यासाठी आलं, ६-७ तुळशीची पाने, दालचिनी, २-३ लवंग, २-३ मिरी, खडीसाखर किंवा गूळ आणि १-२ कप पाणी.
एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात आलं, तुळशीची पाने, दालचिनी, लवंग आणि मिरी घाला. हे मिश्रण चांगले उकळू द्या. पाणी कमी होईपर्यंत उकळत रहा.
शेवटी चवीनुसार खडीसाखर किंवा गूळ घाला आणि मिश्रण गाळून घ्या. हा कोमट काढा दिवसातून २ वेळा प्या.