sandeep Shirguppe
दुर्मिळ असलेल्या गळलिंबाला आयुर्वेदात मोठे महत्व आहे, याच्या औषधी गुणधर्माने अनेक रोगांवर मात करता येते.
पचन, अतिरिक्त चरबी, रक्त शुद्धीबरोबर हृदयविकारांवर रामबाण उपाय म्हणून गळलिंबूकडे पाहिले जाते.
लिंबूवर्गीय असलेल्या या फळाचा रस पायल्यास मुतखडे बारीक होऊन शरीराबाहेर पडतात.
उलटी, मळमळ होणे, तोंडाला चव नसणे असे प्रकार घडत असतील तर तुम्ही गळलिंबू पिल्यास चांगला फरक पडेल.
गळलिंबाचे नियमित सेवन केल्याने किडनीस्टोनमुळे होणाऱ्या वेदना कमी होऊन किडनी स्टोन मूत्र विसर्जनातून निघून जातो.
दातांमधून किंवा हिरड्यांतून रक्त येत असेल तर त्यावर या फळाच्या सालीच्या पावडरचा उपयोग केला जातो.
दूध देणाऱ्या जनावरांचे पोट फुगले किंवा वैरण अपचन झाली तर त्यांना गळलिंबू दिला जातो.
बाजारात मोठ्या प्रमाणात याची विक्री होते. आरोग्यासाठी गळलिंबू गुणकारी असल्याने त्याला मागणीही मोठी आहे.