Aslam Abdul Shanedivan
आपल्या शरीरावर वाढत्या प्रदूषणासह सिगारेटचा धूर आणि काही घातक पदार्थांमुळे परिणाम होतो.
तसेच प्रदुषणाचा आपल्या फुफ्फुसांवरही नकारात्मक परिणाम होतो.
त्यामुळे आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासह फुफ्फुसांची स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, वायू प्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात ४.२ दशलक्षाहून अधिक मृत्यू होतात.
अशावेळी फुफ्फुसांची स्वच्छता ठेवण्यासाठी आयुर्वेदिक पानांचा वापर करता येतो
फुफ्फुसांच्या स्वच्छतेसाठी गिलॉय पानं चांगला पर्याय असून गिलॉयचे सेवन फुफ्फुसांची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढवते.
गिलॉयच्या पानांचा रस तयार करताना १ ग्लास पाण्यात १० ते १५ गिलॉयच्या पानं चांगली उकळून घ्या. त्यानंतर ती वाटून सुती कापडाने गाळून घ्या आणि तो रिकाम्या पोटी घ्या. (अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)