Anuradha Vipat
मेथीमध्ये फायबर भरपूर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
मेथीतील घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे उपयुक्त आहे.
मेथीचे पाणी प्यायल्याने भूक कमी लागते आणि चयापचय क्रिया सुधारते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
मेथीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तरुण आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात.
मेथीचे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते.
मेथीतील घटक रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात, त्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.
काही लोकांना मेथीच्या पाण्यामुळे ऍलर्जी किंवा पचनाच्या समस्या येऊ शकतात.