Team Agrowon
लेखक कवी इंद्रजित भालेराव यांच्या 'तुमची आमची माय' या पुस्तकाचे प्रकाशान शेतामध्ये करण्यात आले.
रानावनात आयुष्य घालवलेल्या आपल्या आईचे जीवन चरित्रावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन रानावनातच करण्यात आले.
रुक्मिणी नारायणराव भालेराव यांचे जीवन चरित्र 'तुमची आमची माय' या पुस्तकाच्या माध्यमातून भालेराव यांनी लिहिले आहे.
कौडगावातील शेतशिवारात वत्सलाबाई आणि सरस्वतीबाई या लेकींच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कवी इंद्रजित भालेराव यांनी आपल्या आईच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त या पुस्तकाची पहिल्या आवृत्तीचे लोकार्पण केले.
या पुस्तकाच्या माध्यमातून तीन पिढ्यांचा जीवन प्रवास आणि एका शेतकरी महिलेने शेतीच्या माध्यमातून केलेला कतृत्त्ववान माणसांचा विकास शब्दबध्द केला आहे.
या पुस्तकप्रकाशनावेळी इंद्रजित भालेराव, अरूण चव्हाळ, कथाकार बबन, आव्हाड अमोल भालेराव, त्र्यंबक वडसकर यांच्यासह स्वकियांचा मेळा उपस्थित होता.