Tomato Damage : टोमॅटोच्या पिकात का सोडली जातायेत जनावरे?

Team Agrowon

मातीमोल दर

टोमॅटोला सध्या मातीमोल दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Tomato Damage | Agrowon

बिकट परिस्थिती

लागवडीपश्‍चात आता फळतोडणी सुरू झाली असताना तोडणी केलेला माल बाजारात न्यायलासुद्धा परवडत नाही, अशी बिकट परिस्थिती आहे.

Tomato Damage | Agrowon

पिकात मेंढ्या

नाशिक येथील समाधान कडू आहेर या शेतकऱ्याने टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या आणि जनावरे चरायला सोडली आहेत.

Tomato Damage | Agrowon

बाजारभाव

समाधान आहेर यांनी दोन एकरमध्ये दोन लाख रुपये खर्च करत टोमॅटोची लागवड केली होती. मात्र सुरवातीला दीडशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.

Tomato Damage | Agrowon

५० रुपये बाजारभाव

पहिल्या-दुसऱ्या तोड्यालाच चाळीस ते पन्नास रुपये बाजारभाव मिळू लागल्याने उद्विग्न होत श्री. आहेर यांनी फळ तयार असलेल्या पिकात मेंढ्या, तसेच जनावरांना चारावयास सोडून दिले.

Tomato Damage | Agrowon

शेतकरी हवालदिल

टोमॅटोचा बाजारभाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Tomato Damage | Agrowon

तोडणीकरिता २५ रुपये

टोमॅटोच्या एका क्रेटला बाजारात नेण्यासाठी तोडणीकरिता २५ रुपये, हाताळणी व प्रतवारीसाठी वीस व वाहतूकखर्च पंधरा ते वीस रुपये, असा सर्वमिळून साधारणतः ६५ ते ७० रुपये खर्च होतो.

Tomato Damage | Agrowon

पीक सोडून देण्याचा पर्याय

काही शेतकऱ्यांची खर्चाची देखील तोंडमिळवणी होत नसल्याने पीक सोडून देण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही.

Tomato Damage | Agrowon
Animal Water management | Agrowon
अधिक वाचण्यासाठी क्लिक करा.