Team Agrowon
जगदगुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत या गावी विसावली.
दौंड तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी दिंड्या यवत मधील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात विसावतात
गेल्या अनेक वर्षांपासून अखंडीतपणे वारकऱ्यांना पिठलं भाकरीचे भोजन दिले जाते.
गोडधोड जेवणानंतर ग्रामीण भागातील ढंगातील चूलीवरील भाकरी व पिठलं जेवणाचा आस्वाद लाखो वारकरी घेतात.
संत ज्ञानेश्वर माऊली, संत सोपानकाकांच्या पालखी सोहळयानंतर गुरुवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी यवत या ठिकाणी भेट दिली.
मंदिराच्या भटारखान्यात सुरू असलेल्या स्वयंपाकात त्यांनी भाकरी भाजण्याचा आनंदही घेतला.
यवतमध्ये पिठलं-भाकरी तयार करण्याची देखील अनोखी प्रथा आहे. एक हजार किलोचे पिठले आणि साठ हजार भाकऱ्या व वीस हजार चपात्या दर वर्षी बनवल्या जातात.
वारकऱ्यांना पुरेल इतके जेवण तेही ग्रामीण ढंगाचे बनविण्याची अनेक वर्षांची परंपरा यवतकरांनी जपली आहे.