Roshan Talape
चेहऱ्यावर काही पदार्थ लावल्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. जाणून घ्या कोणत्या वस्तू टाळाव्यात.
व्हिनेगरमधील आम्लत्व त्वचेसाठी धोकादायक ठरू शकते. चेहऱ्यावर लावल्यास त्वचा कोरडी, जळजळ होणे किंवा अॅलर्जी होण्याचा धोका असतो.
बेकिंग सोड्यामुळे त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होते. यामुळे त्वचा कोरडी, रूक्ष व खाज येण्याची शक्यता वाढते.
लिंबू अति आम्लीय असल्याने लिंबाचा रस चेहऱ्यावर लावल्यास त्वचा जळजळ व डाग पडू शकतात.
चेहऱ्यावर मीठ लावल्याने त्वचा कोरडी व खरखरीत होऊ शकते.
चेहऱ्यावर बेसन वापरल्यास त्वचा कोरडी व निर्जीव होऊ शकते.
कच्च्या हळदीचा चेहऱ्यावर वापर केल्यास त्वचा पिवळसर डाग पडू शकतात.
त्वचेसाठी कोणतेही नैसर्गिक उपाय वापरण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी सौम्य व सॉफ्ट प्रॉडक्ट्सचा वापर करा.