Team Agrowon
पावसाच्या या अकस्मात बदलणाऱ्या स्वरूपामुळे पूर-व्यवस्थापन हे अत्यंत अवघड आणि जोखमीचे होऊन बसले आहे.
धरणात पाणी साठवले तरी पंचाईत आणि पाणी सोडले तरी पंचाईत.
वर्षभर विविध गरजा भागवण्यासाठी पाणी लागते म्हणून त्याचा साठा करण्यासाठी तर आपण धरणे बांधली.
निसर्गाची चंचलता लक्षात घेऊन जेव्हा उपलब्ध आहे तेव्हा पाणी साठवा. धरणे लवकर भरा हे तत्त्व त्यातून आले.
अनेक ठिकाणी बरीच वर्षे ते यशस्वीही होते. पण काही ठिकाणी धरण लवकर भरून ठेवले आणि अचानक पूर आला तर संकटेही येतात.
धरण नक्की किती भरायचे आणि किती पाणी नेमके केव्हा सोडायचे हे अचूक ठरवणे ही अवघड बाब आहे.