Team Agrowon
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे.
वाढत्या तापमानाचा जनावरांनाही फटका बसत आहे. त्यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या तापमानाचा पारा ४० अंशाच्या पार गेल्याचे चित्र आहे. त्याचाच परिणाम हा गायी, म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता आणि उत्पादकतेवर होण्याची शक्यता आहे.
शरीरात या वाढलेल्या तापमानामुळे जनावरांवर ताण येतो. त्यांचे शारीरिक तापमान (१०३ ते ११० अंश फॅरानहाइटपर्यंत) वाढते.
जनावरांचे तापमान नियंत्रण करण्याची शारीरिक सहन क्षमता कमी पडल्यास शारीरिक तापमानात वाढ होते.
एका जागी उभे राहणे, बैचेन होणे, खाली बसणे अशी लक्षणे दिसून येतात. यालाच उष्माघात म्हणतात.