Animal Care : दुष्काळातील जनावरांच्या आरोग्य समस्या

Team Agrowon

कुपोषण

जनावरांना वेळेवर व नियमित पुरेसा चारा व पाणी न मिळाल्यामुळे त्यांचे कुपोषण होते, तर बऱ्याच वेळा चरायला सोडल्यानंतर जनावरांना खाण्यास काहीच न मिळाल्यामुळे त्यांची उपासमार होते.

Animal Care | Agrowon

चयापचयाचे आजार

चयापचयाचे आजार सर्वसाधारणपणे आहारातून कमी ऊर्जेचा पुरवठा झाल्यामुळे उद्‌भवतात.

Animal Care | Agrowon

विषबाधा

अपुऱ्या चाऱ्यामुळे जनावरांची पूर्ण भूक भागत नाही. त्यांचे पोट भरत नाही, त्यामुळे जनावरं कोणतीही हिरवी वनस्पती, खुरटी झुडपं चारा समजून खातात.

Animal Care | Agrowon

अपचन

खराब वातावरण किंवा खुराकातील धान्याच्या प्रमाणातील बदल यामुळे आम्लधर्मीय अपचनाची समस्या उद्‌भवते.

Animal Care | Agrowon

शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरची कमतरता

जनावरांचे संगोपन मुख्यतः वाळला चारा, कडबा, शेतातील दुय्यम पदार्थांवर केले जात असेल तर जनावरांना शरीरपोषणासाठी कॅल्शियम, फॉस्फरसचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व नियमित होत नाही.

Animal Care | Agrowon

शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता

मॅग्नेशियमची कमतरता मुख्यतः थोडा हिरवा चारा व जास्त वाळला चारा उपलब्ध असण्याच्या कालावधीत होते.

Animal Care | Agrowon

उपाय

जनावरांना दूरवर चरण्यासाठी फिरवण्याऐवजी एका ठिकाणी ठेवून त्यांना उपलब्ध चारा द्यावा. जेणेकरून विनाकारण फिरण्यामुळे उर्जेचा ऱ्हास होणार नाही, कोणतीही विषबाधा होणार नाही.

Animal Care | Agrowon