Ravikant Tupkar : ... आणि रविकांत तुपकरांना आले गहिवरून!

Team Agrowon

बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात दाखल होताच शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

Ravikant Tupkar | Agrowon

अनेक शेतकरी येवून भेटत होते तुमच्यामुळे पिकविम्याचे पैसे आले हे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, हे पाहून मलाही आनंदाने गहिवरून आले.

Ravikant Tupkar | Agrowon

त्यानंतर पुढे जसा-जसा बुलढण्याकडे प्रवास चालू झाला तसा जवळा बु. (ता.शेगाव), खामगाव, हिवरखेड (ता.खामगाव), चिखली तालुक्यातील वैरागड, उंद्री, अमडापूर,पेठ, दिवठाणा, सोमठाणा, शिंदी हराळी, सवणा केळवद, बुलढाणा तालुक्यातील साखळी बु. येळगाव यासह अनेक गावच्या फाट्यावर शेतकरी रस्त्यावर उभे होते.

Ravikant Tupkar | Agrowon

माय-माऊल्या औक्षण करत होत्या, कोणी फुले उधळत होतं तर कोणी ढोलच्या तालावर नाचत होतं.

Ravikant Tupkar | Agrowon

चिखली शहरात तर उत्स्फूर्तपणे लोकं रस्त्यावर होते. शहरातील नागरिकांचा मिळणारा पाठिंबा लढायला अजून बळ देणारा आहे.

Ravikant Tupkar | Agrowon

ज्यावेळी बुलढाणा येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर समोर पोहचलो तेव्हा शेतकऱ्यांनी जल्लोषात केलेले स्वागत आयुष्यभर लक्षात राहील. अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली.

Ravikant Tupkar | Agrowon
khillar | Agrowon