Team Agrowon
कृषिक २०२३ या कृषी प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन अमेरिकेच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे MD डॉ. रणवीर चंद्रा,ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन येथील आर्टीफिशीयल इंटेलिजिन्स् विभागाचे संचालक डॉ. अजित जावकर यांच्या हस्ते व ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब, संस्थेचे विश्वस्त,इतर मान्यवर उपस्थितीत झाले.
तसेच आय आय टी खरगपूर, कानपूर, ICAR चे प्रतिनिधी, MPKV राहूरीचे कुलगुरू मा. प्रशांतकुमार पाटील,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मान्यवरांच्या उपस्थित ३ जानेवारी रोजी पार पडले होते.
शेतक-यांसाठी २३ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन खुले असणार आहे.
कृषिकच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे कृषीमंत्री मा.ना.अब्दुल सत्तार,विरोधी पक्षनेते मा.अजितदादा, सांगोल्याचे आमदार मा.शहाजी बापू पाटील यांनी भेट देऊन उपक्रमांची दखल घेतली.
कृषिकचे यंदाचे आठवे वर्ष,यावेळी कृषिकमध्ये १७० एकरावर बी-बियाणे, खते,पिककिड व रोग नियंत्रण या आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
बोटचा कृषि क्षेत्रात वापर, दुग्ध आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान फळप्रक्रिया,वातावरणातील बदलांनुसार शेती पद्धत, दुध व भाजीपाला प्रक्रिया उदयोग, मिलेट दालन,नैसर्गिक शेती असे अनेक नाविण्यपुर्ण उपक्रम पाहण्याची संधी खुली राहणार आहे.