Team Agrowon
नांदेड येथील पावडेवाडीचे मंजूषा व गुलाबराव पावडे या आयटी इंजिनिअर दांपत्याने शेवग्याची व्यावसायिक शेती सुरू केली आहे.
पुणे, हैदराबाद अशा आयटी हब असलेल्या ठिकाणी नामवंत कंपन्यांमध्ये काम केल्यानतंर पूर्णवेळ समाधानाने शेवगा शेतीत रमले आहे.
पावडे यांची सुमारे दहा एकर शेती आहे. २०१८ पासून हे दांपत्य शेवग्याची शेती करतात.
हैदराबाद येथे वास्तव्यास असताना तेथे शेवगा शेतीचे कल्चर त्यांच्या पाहण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी शेवगा शेती करण्याचा निर्णय घेतला.
शेवगा शेतीसोबतच पावडे शेवग्याच्या पाल्यापासून सेंद्रीय पध्दतीने पावडर तयार करतात.
मंजूषा यंनी डिजिटल मार्केटिंग व ‘आयात- निर्यात’ अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. त्यामुळे पावडर विक्री करण्याचा मार्ग सुकर झाला.
गेल्या चार वर्षांपासून पावडे दांपत्य शेवगा शेतीत असून एक वर्षापासून पावडर निर्मितीही करत आहेत.