sandeep Shirguppe
आवळ्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्याचा उपयोग केसांच्या मजबूतीसह त्वचेवर चमक आणण्यासाठी होतो.
आवळा खाल्ल्यानंतर त्याच्या बिया आपण फेकून देतो. बियांचा फायदा आपल्या आरोग्यावर चांगला होतो.
आवळ्यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, कॅरोटीन, लोह आणि फायबरसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात.
आपल्याला बद्धकोष्ठता, अपचन किंवा आम्लपित्ताची समस्या असेल तर आवळ्याच्या बियांचा पावडर गुणकारी ठरू शकते.
खोबऱ्याच्या तेलात आवळ्याच्या सुक्या बिया घालून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास मुरूम भरून निघेल.
अति उष्णतेमुळे नाकातून रक्त येते अशावेळी आवळ्याच्या बियापासून बनवलेल्या पावडरची पेस्ट तयार करून डोक्याला लावावी.
तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर आवळ्याच्या बियांची पावडर मधात मिसळून खा आराम मिळेल.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.