sandeep Shirguppe
कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेला आंबोली धबधबा प्रवाहीत झाला आहे. या धबधब्यामध्ये मजा करण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात.
दरम्यान धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना पुन्हा एकदा तिकीट आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाबाबत सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी माहिती दिली, १४ वर्षांवरील व्यक्तीला २० रु., तर ५ वर्षावरील मुलास १०रु. शुल्क आकारण्यात येणार आहे.
कोरोना काळापूर्वीपासून आंबोली आणि पारपोली गावकऱ्यांच्या संघर्षामुळे शुल्क आकारणी थांबवली होती. मात्र, आता ८ जुलैपासून अंमलबजावणी होणार आहे.
यातून मिळणारी रक्कम धबधबा व्यवस्थापनासाठी तात्पुरत्या स्वरुपात काम करणाऱ्या मजुरांसाठी तर उर्वरित रक्कम ही पारपोली, आंबोली व चौकुळ या गावच्या वनविकासासाठी वापरण्यात येणार आहे.
तसेच शासकीय जंगलात अपप्रवेश केल्यास कायदेशिर कारवाई करण्यात येईल, अशा इशारा उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेडी यांनी दिला आहे.
धबधब्याच्या ठिकाणी व पाट परिसरात तसेच वनहद्दीत कचरा करण्याऱ्यावर आता कारवाई होणार आहे.