Almatti Dam : अलमट्टी धरण भरले, 'तर पुन्हा कोल्हापूर, सांगलीला महापुराचा धोका'?

sandeep Shirguppe

तर पुन्हा महापुराचा धोका

अलमट्टी, कोयना धरणातील पाणीसाठा व त्याच्या परिचलनाबाबत सूचनांचे पालन न केल्यास पंधरा ऑगस्टपर्यंत महापुराचा पुन्हा धोका संभवण्याची भिती एका निवेदनाद्वारे निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी व्यक्त केली आहे.

Almatti dam | agrowon

अलमट्टी धरण पूर्ण भरले

अलमट्टी धरणामुळे महापुराचा धोका निर्माण होतो. १२३.०८ टीएमसी क्षमता असलेले धरण ११७.३ टीएमसी भरले आहे. दरम्यान हे धरण भरले की महापुराचा धोका निश्चितच वाढणार आहे.

Almatti dam | agrowon

धरण क्षेत्रात पाऊस

अशातच कोयना, वारणा, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि अन्य सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.

Almatti dam | agrowon

कोयना धरणात ८० टीएमसी पाणीसाठा

कोयना धरणात सध्या ७९.७० टीएमसी व वारणा धरणात २९.१७ टीएमसी पाणी आहे. परंतु पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, तर ही दोन्ही धरणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणे लवकरच भरतील

Almatti dam | agrowon

विसर्ग वाढवण्याची गरज

मग विसर्ग प्रचंड प्रमाणात वाढवावा लागेल. त्याचवेळी अलमट्टी धरणातून विसर्ग कमी असेल, तर महापुराचा धोका संभवण्याची भिती आहे.

Almatti dam | agrowon

अलमट्टीची आवक वाढवावी लागेल

सध्या अलमट्टी धरणात आवक जास्त आणि जावक कमी असल्याने पाण्याचा दाब सांगली कोल्हापुरातील नद्यांना बसू शकतो. अशातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचे प्रमाण चार-पाच दिवसांत वाढणार आहे.

Almatti dam | agrowon

राज्य शासनाने समन्वय साधावा

याबाबत राज्य शासन व जलसंपदा विभाग यांनी तातडीने कर्नाटकाशी समन्वय साधून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला पाहिजे.

Almatti dam | agrowon

अन्यथा गंभीर स्थिती

अन्यथा गंभीर स्थिती निर्माण होईल. यंत्रणेने आधी महापूर येऊ नये, यासाठी उपायांकडे लक्ष द्यावे असे सांगण्यात आले आहे.

Almatti dam | agrowon

पंचगंगा पात्रात

सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाली असून नदी पात्रात आली आहे. दरम्यान पुन्हा पाऊस सुरू झाल्यास पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.

Almatti dam | agrowon

चांदोली धरणातून विसर्ग

सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्याही पात्रता गेल्या आहेत.

Almatti dam | agrowon
kas plateau | Agrowon
आणखी पाहा...